शनिवार, डिसेंबर ०३, २०११

अस्वस्थ मनातील नोंदी … 3


माणसाच्या कृतीमागे नेमक्या कुठल्या प्रेरणा असतात?  एखादी घटना घडते, क्वचित प्रसंगी अचानक घडते, त्यामागे नेमकी कुठली प्रवृत्तीक शक्ती असते? कि जे जे माणूस करतो त्यामागे त्याच्या मानसिक द्वंद्वाचा  आणि सुप्त मनोव्यथेचा प्रदीर्घ इतिहास असतो?

कुठली तरी रसगंध आकांक्षा, एखादे सूरनादी स्वप्न  उराशी बरेच दिवस कवटाळून बसल्यावर ते जीर्ण शीर्ण होऊन गंजू लागतं. कदाचित त्या बुरसटल्या  स्वप्नांचा, आशांचा त्या मूर्ख आणि बेवकूफ क्षणांशी संबंध असावा. कांही तरी घडून जाते आणि मगच विचारचक्र सुरु होते. हे कां घडलं? कसं घडलं? हे अभिप्रेत नसताना घडलं तरी कां? ही नियती की  प्रारब्ध?  कि आयुष्याला फरपटत नेणारी दुर्घटनांची गाडी?    


घटना घडून गेल्यावर ती दुरुस्त करण्याची, भंगलेल्या क्षणांना सांधायची, विस्कटलेल्या आयुष्याला मन:पूर्वक आकार द्यायची शक्ती माणसांत कां नसावी? हिंमत कां नसावी? प्रतिमा डागाळण्याची ही भीती इतकी खोलवर रुजलेली कां असावी? 






  
      
saMMskRita Hyaa rajama
saMMskRita Hyaa


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा