दादा,
दहा वर्षे झाली, तुमचे पत्र नाही. तसेही तुम्ही पत्र फार लिहीतच नव्हता. फार पूर्वी सणासुदीला, नवीन वर्षाला शुभेच्छा यायच्या, शेवटच्या काही वर्षात तर फक्त माझ्या वाढदिवसाला "शुभेच्छा" यायच्या, आडव्या पोस्टकार्डवर टपोऱ्या सुंदर अक्षरात लिहिलेल्या शुभेच्छा. शेवटच्या शुभेच्छा आल्या त्यालाही आता दहा वर्षे झाली
तुमच्या सुंदर अक्षराचे मला लहानपणापासून आकर्षण,
तुम्ही कधी टंकलेखन केले नाहीत, अशिलांच्या सर्व कामकाजाचे ड्राफ्ट
स्वत:च्या अक्षरात लिहून मग ते टायपिंगला जात. तुम्ही ऑफिस मध्ये नसलात कि
तुमची ती अक्षरे पाहायला मला खूप आवडायचे. अक्षर चांगले व्हावे म्हणून
तुम्ही लहानपणी जे काही केले ते करायचा मी प्रयत्न केला.
खांडेकरांच्या दुकानातून बोरू आणले, टाक आणला आणि शाईच्या दौतीत बुडवून
कागदावर लिहायचा प्रयत्न केला. शब्द उतरायच्या आधीच कागदावर शाईचे थेंब
पडायचे !!दहा वर्षे झाली, तुमचे पत्र नाही. तसेही तुम्ही पत्र फार लिहीतच नव्हता. फार पूर्वी सणासुदीला, नवीन वर्षाला शुभेच्छा यायच्या, शेवटच्या काही वर्षात तर फक्त माझ्या वाढदिवसाला "शुभेच्छा" यायच्या, आडव्या पोस्टकार्डवर टपोऱ्या सुंदर अक्षरात लिहिलेल्या शुभेच्छा. शेवटच्या शुभेच्छा आल्या त्यालाही आता दहा वर्षे झाली
१२ ऑक्टोबर २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा