मंगळवार, ऑक्टोबर २७, २००९

अभिवादन एका नटश्रेष्ठाला


चित्तरंजन कोल्हटकर कालवश झाले। रंगमंचीय शक्ति ज्याला वश झालेली होती असा अभिनेता कालवश कसा होईल? कालवश झाले ते त्यांचे पार्थिव। शम्भू महादेव, बापू आणि चाणक्य ह्या त्यांच्या भुमिकांतुन मी सशक्त अभिनयाचा थरार प्रत्यक्ष पाहिलेला आहे। त्या आधी त्यानी साकारलेल्या भूमिका मला बघायला मिळाल्या नाहीत। गारंबीच्या बापूचा इन्दौरला प्रयोग झाला त्यावेळी त्याना भेटण्याचा योग निस्सीम त्यांच्यातील निस्सीम माणसाचे ही दर्शन झाले। गारंबीच्या बापूची पूर्ण टीम चहापानासाठी आम्हा हौशी रंगभूमि कलाकारांसोबत एका संध्याकाळी महाबळ्यांच्या घरी एकत्र झाली, गप्पांमधे शामिल झाली। त्या गप्पाना आठवत त्या महान कलाकाराला विनम्र अभिवादन!

1 टिप्पणी:

  1. केवळ कोल्हटकरांना एकदा तरी रंगमंचावर पाहता येईल म्हणून
    संभाजीनगर मध्ल्या त्यांच्या शेवटच्या "एकच प्याला"च्या प्रयोगाला धडपडत गेलो होतो. गेलो ते बरे केले. कारण ते आज तसेच्या तसे डोळ्यापुढे उभे राहतात.

    उत्तर द्याहटवा