खूप आकर्षक आहेत यंदाचे दिवाळी अंक. बाजारात केळी घेताना, गाडी मागच्या दुकानांत मांडलेले दिसले. बाजार थैली जड होण्याआधी थोडी #मौज करावी म्हणून गाडी पलीकडे गेलो. सर्व अंकांवरुन नजर फिरवली, किंमतीतलं वैविध्य उठून दिसलं. महिन्याच्या महिन्याला वर्तमान पत्राची रद्दी देत असल्याने प्रत्येक अंकाच्या वजनाचा अंदाज पटकन घेता आला. #सुगंधचा अंक हातात घेतला तर हाताला धूळ लागली. मग लक्षात आलं, धूळ साऱ्याच अंकांचं परिक्षण करत असल्यासारखी पसरली होती. तशीही #दीपावली सरली होती. मी #आवाज न करता पुढे निघालो. घरात भाजी नव्हती. भाजीच्या दुकानासमोर आलो. साऱ्या भाज्यांचा एकच भाव. पाणी मारून फ्रेश ठेवलेल्या. दूधी प्लास्टिक वेष्टनात. दोन दिवसांची भाजी घेऊन घरी परतलो.
हिनं अचानक विचारलं, यंदा तुम्ही दिवाळी अंक नाही घेतलात? नाही घेतला. इंटरनेटवर मिळतं वाचायला... अंक घेतला की आवरुन ठेवायचा मोह होतो, आणि त्यावर धूळ साचत रहाते...
- श्रीधर जहागिरदार
१८-११-२०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा