रविवार, नोव्हेंबर १८, २०१८

भक्तिभावबेगडी भक्तिभावाने साखर झोपेचा खून करून
हिवाळी कोवळ्या उन्हात शांत पहुडलेल्या कर्ण्यांवर
शिटताहेत कबुतरे आणि काही कावळे;
पोपट, चिमण्या बागडताहेत हिरव्या अंगाखांद्यांवर
कुजबुजताहेत रशरशीत जीवन गाणी सुखदायी काकड वेळेपासुन ....
ह्यातले तुझ्यापर्यंत काय पोहचत असते रे?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा